आम्ही कोण आहोत
पुस्तक आणि बरच काही ही साहित्यप्रेमी लोकांच्या माध्यमातून सामाजिक माध्यमाच्या द्वारे वर्ष जुलै २०२१ मध्ये उभारलेली एक साहित्य चळवळ आहे. या चळवळीचे मुख्य उद्धिष्ट हे येणाऱ्या पिढ्यांमध्ये वाचनाची आवड जोपासणे आहे.
आमचे उद्दिष्ट
ग्रामीण भागात आणि शाळांमध्ये लायब्ररी सुरू करणे.वाचन व गोष्टी सांगण्याची शिबिरे आयोजित करणे.मुलांना, महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोफत पुस्तके उपलब्ध करून देणे. डिजिटल वाचन आणि ई-लायब्ररीबद्दल जनजागृती करणे.
आमचे ध्येय
पुस्तकांच्या माध्यमातून प्रेरणा, शिक्षण आणि आनंद सर्वांसाठी. वाचन संस्कृती वाढवून साक्षर आणि सजग समाज घडवणे. वाचनाच्या माध्यमातून विचारशील आणि सशक्त समाज घडवणे. डिजिटल आणि मुद्रित वाचन दोन्ही माध्यमांतून सर्वत्र पोहोचवणे.
आमची मूल्ये
साक्षरता: प्रत्येक घरात वाचन संस्कार निर्माण करणे.
प्रेरणा: वाचनातून विचार आणि कृती दोन्हीला चालना.
सहकार्य: समाजाच्या सहभागातून वाचन चळवळ उभारणे.
सेवा: पुस्तक दान हे ज्ञानदानाचे सर्वात मोठे कार्य.





![कुब्रिक[KUBRICK]](https://pustakanibarachkahi.com/wp-content/uploads/2025/10/2-1-150x150.png)