Description
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातील संपादक सरोजकुमार मिठारी यांचे जगणे वळणभरल्या मार्गावरून खडतरपणे झाले. मात्र, ते तोल सावरत पुढे जात राहिले. शिक्षण, पत्रकारिता, शिक्षकी पेशा, खासगी आयुष्य, नातेसंबंध या सर्व आघाड्यांवर त्यांना संघर्ष करावा लागला. पोटाला चिमटे काढून शिक्षण घ्यावे लागले, काही निर्णय घेताना आप्तजन दुखावले, निर्णय घेताना तारेवरील कसरत करावी लागली. अनेकदा कोलमडून पडायला झाले; पण त्यातून सावरून ते पुढं जात राहिले. व्यवहारी जगण्यात संवेदनशीलता जपत राहिले. कधी कोणाबद्दल आकस धरला नाही. जीवन घुसळणीतून जे नवनीत त्यांना गवसले, ते त्यांचं सध्याचं जगणं आहे.. त्याला अविरत कष्टाची आणि अभ्यासाची जोड आहे. हे कोणताही अभिनिवेश न बाळगता जसे आहे तसे साध्या सोप्या शब्दांत त्यांनी ‘वळण’ या आत्मकथनात मांडले आहे. त्यात खऱ्या अर्थाने जगण्याची लढाई आहे आणि परिस्थितीवर स्वार होण्याचं भक्कम अधिष्ठान आहे.
Reviews
There are no reviews yet.